पुणे : विधानसभा निवडणुकीत कोथरूडमध्ये थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना आव्हान देणारे अमोल बालवडकर यांचा अखेर राजकीय पत्ता कट झाला आहे. विधानसभेला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमोल बालवडकर यांना आता पुणे महानगरपालिका निवडणुकीतही भाजपने साफ डच्चू दिला आहे. प्रभाग क्रमांक नऊ मधून लहू बालवडकर यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आले आहेत.
प्रभाग नऊ मधून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार यावरून गेल्या काही दिवसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कोथरूड विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल बालवडकर यांनी आपण स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. मोर्चे, बैठकांमधील नाराजी आणि थेट विरोधामुळे हा वाद इतका पेटला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मध्यस्थी करावी लागली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीत अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारून भाजपने स्पष्ट संदेश दिला आहे ‘पक्षशिस्त मोडणाऱ्यांना माफी नाही’ असा संदेश दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपने लहू बालवडकर यांना अधिकृत उमेदवारी देत धक्कातंत्र अवलंबले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युवकांचे संघटन अन् पक्षासाठी प्रामाणिक काम, राघवेंद्र मानकरांच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी…
-पुणेकर महायुतीलाच आशीर्वाद देणार, गणेश बिडकर यांनी भरला भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज
-महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का
-PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी
-पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत














