Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे’- डंबाळे

by News Desk
September 15, 2025
in Pune, महाराष्ट्र, राजकारण
‘हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे’- डंबाळे
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सर्व निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात. निवडणूक प्रक्रियेवर निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे आगामी महापालिका निवडणूक ईव्हीएमवर न घेता मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. कर्नाटक सरकारने नुकताच घेतलेला निर्णय आदर्श म्हणून दाखवत, महाराष्ट्रातही हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच पुणे शहरात सुरू असणाऱ्या एसी आरक्षणाच्या वादावर देखील डंबाळे यांनी परखड भूमिका मांडली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करणे प्रत्येक शासकीय यंत्रणेसाठी बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी देखील पुणे शहरात प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, महाविकास आघाडीचा काही नेत्यांकडून पुण्यातील दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करून जातीय तेढ वाढवण्याचे काम होत आहे, अशी टीका राहुल डंबाळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रस्ता पेठ संदर्भात हेतुपुरस्सर माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना बदनाम करण्यासाठी लक्ष्य केले जात असल्याचा दावा डंबाळे यांनी केला आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

डंबाळे म्हणाले की, “निवडणुकीसाठी राजकीय आरक्षणाची तांत्रिक रचना निवडणूक आयोग व उच्च न्यायालय ठरवते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाने अनुसूचित जातींचे आरक्षण बदलणे कोणालाही शक्य नाही. याची जाणीव असूनही खोटा प्रचार करून समाजात जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न मविआकडून सुरू आहे. रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने शहरातील सर्व प्रभाग रचनेतील अन्यायकारक तरतुदींवर आक्षेप घेतले असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे.”

२०१७ च्या अपवाद वगळता, गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात रास्तापेठ – सोमवार पेठ या प्रभागात एससी आरक्षण लागू झालेले नाही. या भागात समाविष्ट असणारी अनुसूचित समाजाची लोकवस्ती दुसऱ्या प्रभागात गेल्याने हे आरक्षण आता संबंधित प्रभागात कायम आहे. तरीही तथ्यांचा आधार न घेता गणेश बिडकर यांच्यावर आरोप करणे हा जाणूनबुजून केलेला खोटारडेपणा आहे. कोणत्याही नेत्याविषयी खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गलिच्छ राजकारणाला अनुसूचित जाती समाज आणि आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल व कधीही थारा देणार नाही, असं राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags: bjpGanesh BidkarOBC ReservationpunePune Municipal ElectionRahul Dambaleओबीसी आरक्षणगणेश बीडकरपुणेपुणे पालिका निवडणूकभाजपराहुल डंबाळे
Previous Post

गुलाबी जॅकेट काढत अजितदादा बनले रजनीकांत! पालिका निवडणुकीसाठी उपनगरांत साखरपेरणी

Next Post

पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस

पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस

Recommended

United And City Dispute The Blame for Manchester Derby Tunnel Bust-up

November 5, 2023
कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

November 20, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved