Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

गुलाबी जॅकेट काढत अजितदादा बनले रजनीकांत! पालिका निवडणुकीसाठी उपनगरांत साखरपेरणी

by News Desk
September 13, 2025
in पुणे शहर, राजकारण
गुलाबी जॅकेट काढत अजितदादा बनले रजनीकांत! पालिका निवडणुकीसाठी उपनगरांत साखरपेरणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम प्रभाग रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपसह सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हडपसरमधील ‘जनसंवाद दौऱ्या’ने निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार होताना दिसत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा दावा होत असला, तरी प्रत्यक्षात ही महापालिकेच्या साखरपेरणीचीच सुरुवात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पुणे शहर व जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव प्रचंड होता. 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता, तर अजित पवार हे उपनगरांमधील बालेकिल्ल्यांवर ठाम पकड ठेवून होते. मात्र 2014 नंतर भाजपने राज्यात सत्ता मिळवली आणि त्याचा थेट परिणाम पुणे शहराच्या राजकीय समीकरणावर झाला.. 2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला. हा विजय फक्त स्थानिक पातळीवर नव्हता, तर राज्यातील भाजपच्या वाढत्या पकडीचे प्रतिक होता.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

भाजपचा पुण्यात वाढलेला प्रभाव

2014 पासून राज्यातील सत्ता भाजपकडे आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत भाजपने राज्यात आपली पकड कायम ठेवली. या माध्यमातून पुणे शहरात विकासकामे, पायाभूत सुविधा, मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल अशा प्रकल्पांद्वारे भाजपने आपली ताकद वाढवली. पुणे शहरातील मध्यवर्ती मतदारसंघ जसे की पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कोथरूड या भागात भाजपने आपला प्रभाव वाढवला असून या भागातील बहुतांश नगरसेवक त्यांच्याकडेच आहेत.

अजित पवारांची खरी ताकद पुण्यातील उपनगर भागात आहे. हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या भागातून 2017 मध्ये राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले होते. 42 नगरसेवकांपैकी बहुतांश उपनगरातूनच आले होते. पुण्यातील मध्यवर्ती भागात राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कोथरूड येथे बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे अजितदादांनी आगामी निवडणुकीत पुन्हा उपनगरांवरच लक्ष केंद्रित केले आहे.

मोर्चाबांधणीची नवी रणनीती : जनसंवाद दौरा

अजित पवार यांनी अलीकडेच जनसंवाद दौऱ्याला सुरुवात केली आहे. हडपसरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला अनेक सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामुळे नागरिकांना थेट जनता दरबारात आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी मिळत आहे. या दौऱ्यांमुळे उपनगरांमधील सुस्तावलेली राष्ट्रवादीची संघटना पुन्हा जागी होईल, असा पक्षातील नेत्यांना विश्वास आहे. “चांद्यापासून बांद्यापर्यंत” जनसंवाद दौरे काढण्याचा अजित पवारांचा मानस जाहीरपणे व्यक्त झाला आहे. त्यामुळे ही फक्त लोकसंपर्क मोहिम नसून महापालिका निवडणुकीची साखरपेरणी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील सत्तेचे समीकरण गेल्या काही वर्षांत वेगाने बदलले आहे. 2014 ते 2019 भाजप-शिवसेना सरकार, त्यानंतर दोन वर्षे महाविकास आघाडी, आणि पुन्हा भाजप-शिंदे गटाची सत्ता. या बदलत्या सत्तासमीकरणाचा थेट परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवर दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन आणि अजित पवार गटाची सत्ताधारी आघाडीत झालेली एंट्री हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत अजित पवार यांचे समीकरण जुळते? की राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात भाजपची पकड, तर उपनगरांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असे स्पष्ट चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपच बहुमत मिळवेल, असा अंदाज वर्तवला जात असला, तरी अजित पवारांनी उपनगरांमध्ये सूर केलेली मोर्चाबांधणी भाजपपुढे तगडे आव्हान उभे करू शकते.

Tags: ajit pawarHadapsarKasbaKhadakwaslaKothrudMunicipal ElectionsParvatiPune CityPune Municipal CorporationShivajinagarVadgaon Sheriअजित पवारकसबाकोथरुडखडकवासलापर्वतीपालिका निवडणूकपुणे महानगरपालिकापुणे शहरवडगाव शेरीशिवाजीनगरहडपसर
Previous Post

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा; अयोध्या, वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘थ्रीडी ड्रोन शो’

Next Post

‘हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे’- डंबाळे

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

by News Desk
May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

by News Desk
May 29, 2026
Next Post
‘हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे’- डंबाळे

'हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे'- डंबाळे

Recommended

अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?

अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?

February 21, 2024
Ajit Pawar

‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा

September 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
Pune

भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved