पुणे : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचाय समित्यांची आरक्षण सोडत आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्यांची सोडत दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गटाची इच्छुकांना प्रतिक्षा होती. आरक्षण आपल्या सोयीचे जाहीर व्हावे, म्हणून इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. या आरक्षण जाहारी होण्यापूर्वीच इच्छुकांचा छुपा प्रचार सुरु होता. आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रचाराला खरा रंग येणार आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती – भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता.मावळ, हवेली – उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती – बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड येथे होणार आहे.
भोर – अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर, बारामती पंचायत समिती– कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-६ वर्षांचं प्रेम, विश्वासघात अन्….; पुण्यातील हॉटेलमध्ये असा झाला लव्ह स्टोरीचा ‘द एन्ड’
-संग्राम जगतापांचं ‘ते’ वक्तव्य अन् अजितदादा पाठवणार ‘कारणे दाखवा नोटीस’
-‘माझ्या लेकराला पळून जायचं नव्हतं, राजकारणी त्याला जगू देत नाहीत’, निलेशच्या आईचा गंभीर आरोप
-दिव्याखाली अंधार! गुंडगिरीवरून भाजपकडे बोट; त्याच धंगेकरांचा चिरंजीव कुख्यात गुंडासोबत
-“मी ‘तो’ निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला”, गुंड निलेश घायवळबाबत गृहराज्यमंत्री कदमांची प्रतिक्रिया














