पुणे : अनेक गुन्ह्यांची नोंद असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याआधीच तो देश सोडून फरार झाला. निलेश घायवळला देशाबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट कोणी दिला यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पुणे गुंडगिरीमागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. निलेश घायवळ याच्या भावाला बंदुक परवाना देताना थेट गृहराज्यमंत्र्यांकडूनच आदेश देण्यात आल्याने पोलिसांनी हा परवाना दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबत योगेश कदम यांनी परवान्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं काय म्हणाले योगेश कदम?
त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू केलं जातं. याबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईल. मी सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिलंय. मी या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना देण्याबाबत माझ्याकडून शिफारस झालेली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आजपर्यंत आमच्याकडून कधी झालेलं नाही, यापुढेही कधी होणार नाही, असं योगेश कदम म्हणाले.
जे काही गुन्हे दाखल होते, तरीही लायसन्स कसे दिले ह्या सर्व आरोपांची माहिती मी लवकरच देईन. जेव्हा अपील केली जाते, ती वैयक्तिक अपील असते. त्यामुळे, शेवटी त्या वक्तीचं कॅरेक्टर कसं आहे हे पाहिलं जातं. सचिन घायवळवरती १५-२० वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्यातून २०१९ मध्ये न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये, सेटलमेंट सुद्धा नाही, हे सगळे लक्षात घेऊनच मी सब कॉन्सियस माईंडने हा निर्णय घेतल्याचं योगेश कदमांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी
-पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत
-पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद
-‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती
-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध














