पिंपरी : सोशल मीडिया वापरा, पण सोसल तितकाच वापरा. त्या अति वापर किंवा चुकीचा वापर हा तुमच्या अंगलट येऊ नये. सोशल मीडियावरुन ओळख करणं एका तरुणीला चांगलंच भोवलं आहे. फेसबुकवर ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर तरुणाने तरुणीचा विश्वास संपादन करून तिची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना आंबेठाण येथे घडली आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी घडली असून, २५ वर्षीय तरुणीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने फेसबुकवर फिर्यादीशी मैत्री केली आणि हळूहळू तिचा पूर्ण विश्वास संपादन केला. नंतर त्याने स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीकडून आर्थिक मदत मागितली. यातून त्याने फिर्यादीकडून ९२ हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल अशा मौल्यवान वस्तू घेतल्या. वस्तू घेतल्यानंतर आरोपीने त्या परत करण्याचे टाळाटाळ केली आणि संपर्क तोडला.
फिर्यादीने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने उत्तर दिले नाही. शेवटी विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत फसवणूक आणि अपहाराचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरून ओळख करून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी तरुण-तरुणींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील प्रेमाचं जाळं आणि विश्वासघाताच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम
-“११०८ मते कमी कशी? प्रशासनाने उत्तर द्यावं”; पुणे महापालिका निकालावर वसंत मोरेंचा आक्षेप
-‘ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार’, राघवेंद्र मानकरांचे आश्वासन














