Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

by News Desk
February 17, 2026
in Pune, Sports, पुणे शहर
युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ‘सुपर सनी मंथ’ (Super Sunny Month) मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. ‘मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांना खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून अतिशय जोरदार आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धांची नावनोंदणी अतिशय उत्साहात होत आहे.’

“आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. ‘सुपर सनी मंथ’च्या माध्यमातून प्रत्येक युवकाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी आणि आपल्या परिसरातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडावेत, हीच माझी मनापासून इच्छा आहे.” या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमुळे तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे. समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले आहे. या माध्यमातून गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये १०,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५,५०,००० रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि.५ मार्चपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.

जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा बुधवार, १८ फेब्रुवारी आणि गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे, युवा खेळाडूंना प्रोत्सहाण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धत एकूण ६०,००० रुपयांची बक्षिसे, प्रशस्तिपत्रक आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार

विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ८०० कराटेपडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलीसाठी या स्पर्धा १ मार्च रोजी सुस रोड येथील सनी वर्ल्ड येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलीसाठी होतील. स्पर्धेत एकूण १,५०,०००रुपयांची पारितोषिके, प्रशस्तिपत्रक आणि पदके चषक देण्यात येणार आहेत.

सोमेश्वर चषक २०२६ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ९, ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ५०,००० रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. हि स्पर्धा रुक्मिणी हॉल या ठिकाणी १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार आहे. सुशील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ६०,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार असल्याचे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भरत देसडला यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये २०० हुन अधिक अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी होणार आहे. ब्रिजमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हि या स्पर्धा होत असून एकूण ८५,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली जिल्हास्तरीय १२ व १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १५० हुन अधिक खेळाडू झुंजणार आहेत. हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.

पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली सोमेश्वर करंडक खुल्या व विविध वयोगटातील एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. हि बुद्धिबळ स्पर्धा ७,१०,१२ व १५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण १,००,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम

-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट: सत्र न्यायालयाकडून 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

-गणेश बिडकरांची मागणी अन् प्रशासनाचा ग्रीन सिग्नल, पुणेकरांना मिळाला मोठा दिलासा

-पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी! १८ तारखेला होणार अध्यक्षपदाची निवड

-सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात ‘दादांचा’ शिरस्ता पाळणार; कार्यकर्त्यांसाठी घेतला खास निर्णय

Tags: puneSunny NimhanYoungखेळाडूपुणेसनी निम्हण
Previous Post

महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम

Next Post

शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Next Post
शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

Recommended

mahesh landge and Ajit Pawar

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं

February 6, 2025
फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

June 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved