मुंबई : राज्यातील धडाकेबाज आणि खमक्या ‘आयएएस’अधिकारी रूबल अग्रवाल यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मोठी संधी दिली असून, कोकण विभागीय आयुक्तपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी बड्या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावली असतानाही, फडणवीस यांनी रूबल अग्रवाल यांच्या बदलीचा आदेश काढण्याचे फर्मान सोडले आणि जेमतेम पाच-सहा तासांत बदलीही झाली. रूबल अग्रवाल या फडणवीस यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात.
रूबल अग्रवाल यांना विभागीय आयुक्त करून फडणवीस यांनी शिंदेंना झटका दिल्याचे मानले जात आहे. यापदावर इतर एक अधिकाऱ्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांने आटापिटा केला होता. मात्र, फडणवीस करायचे ते करून कोकण विभागीय आयुक्तपदाची महत्वाची जबाबदारी रूबल अग्रवाल यांच्याकडे सोपवली आहे. पुणे महापालिकेत धडाकेबाज निर्णय आणि अंमलबजावणीने चर्चेत राहिलेल्या, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ‘कमिशनर’ राहून ‘स्मार्ट वर्क’ करणाऱ्या रुबल अग्रवाल या सध्या ‘एमएमआरडीए’तील मेट्रोच्या ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ या पदावर होत्या. या काळात त्यांनी मुबंई मेट्रोत बदल केले. राज्यात गेल्या १५-१६ वर्षांत रुबल अग्रवाल या वेगवेगळ्या खात्यात काम केले आहे. त्या २००८
बॅचच्या ‘आयएएस’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी आहेत. या काळात त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. या काळात प्रचंड आक्रमकपणे प्रशासकीय यंत्रणेत बदल घडवून अग्रवाल यांनी बड्या राजकारण्यांना वठणीवर आणले होते. त्यामळे जिल्हाधिकारी म्हणून अग्रवाल यांची कारर्कीद गाजली. त्यानंतर त्यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी आली. आधीच चर्चेत असलेले हे पद पहिल्यांदाच महिला ‘आयएएस’कडे आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. मात्र, या पदावर येताच त्यांनी संस्थानने आखलेल्या मात्र, रखडलेल्या योजनांना ‘बूस्ट’ दिला. त्यानंतर मात्र, २०१९ मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात त्यांच्याकडे महापालिकेतील आरोग्यासह महत्त्वाच्या खात्याची जबाबदार राहिली. याचदरम्यान कोरोना साथी आली. सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या पुण्यातील आरोग्य व्यवस्था व्यापक करून, कोरोना नियंत्रण ठेवण्याची मोहीमही अग्रवाल यांच्याकडे राहिली. या साथीत महापालिकेचे ७२ रुग्णालयांत उपचार व्यवस्था उभारण्यापासून जम्बो कोविड सेंटरही त्यांची सांभाळले. कोविड काळातील अग्रवाल यांच्या निर्णयाचा धडाका दिसून आला आणि त्यांनी पुणेकरांची मने जिंकली. अतिरिक्त आयुक्त, जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुखपदाची जबाबदारी असतानाच ऐन कोविडच्या काळात अग्रवाल यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या ‘सीईओ’ म्हणून नेमणूक करण्यात आली.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या ‘सीईओ’ म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातून प्रकल्पा योजनांना गती देण्यात अग्रवाल यांचा पुढाकार राहिला. तसेच, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली. कुपोषण रोखण्यापासून महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या खात्यात अग्रवाल धाडसी निर्णय घेतले. आधी ठाकरे सरकार आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये त्यांच्याकडे हे खाते कायम राहिले. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या मेट्रोला अधिक गतीमान करण्यासाठी अग्रवाल यांची ‘एमएमआरडीए’त बदली करण्यात आली होती. त्या आता कोकण विभागीय आयुक्त असतील.














