Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

‘…तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’; देसाईंचा मंत्री मुंडेंना इशारा

by News Desk
January 20, 2025
in Uncategorized
Trupti desai
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माध्यमांसमोर येत मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड याच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत धक्कादायक आरोप केले होते. यावरुन त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे देसाई त्रस्त झाले असून त्यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

संतोष देशमुख प्रकरणी सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया उमटत असून शाब्दिक वाद होत आहे. अशात राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर नेत्यांना ट्रोल करण्यात येत आहे. यावरुनच तृप्ती देसाई यांना देखील त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावर पुन्हा तृप्ती देसाई यांनी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

‘धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, मी अजून फार काही बोललेले नाही. परंतु सातत्याने खालच्या पातळीवर ट्रोलिंग केली तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’, असा इशारा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

देसाई यांनी माध्यमांसमोर बोलताना अनेक गंभीर आरोप केले होते. ‘संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असताना देखील मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. वाल्मिक कराड हा १५ आणि १६ डिसेंबर रोजी नाशिकमधील एका मठामध्ये वास्तव्यास होता. तेथे आरोपीला लपण्यासाठी जागा दिली. त्यामुळे या मठाच्या प्रमुखांवर देखील कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

-मुंढव्यातील ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

-राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट

-सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?

-पुण्याचा कारभारी कोण? मुरलीधर मोहोळांनी स्पष्टच सांगितलं

Tags: Democracydhananjay mundeNationalist Congress PartyParliTripti Desaiतृप्ती देसाईधनंजय मुंडेपरळीराष्ट्रवादी काँग्रेसलोकशाही
Previous Post

‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Next Post

बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत…; पुण्यात धक्कादायक प्रकार

News Desk

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post
Pune

बायको प्रेग्नंट, तरीही नवऱ्याने अविवाहित म्हणत डॉक्टर तरुणीसोबत...; पुण्यात धक्कादायक प्रकार

Recommended

‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश

‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश

November 20, 2025
‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण

‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण

April 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved