पुणे : पुणे शहरात अनेक भागात स्ट्रिट शॉपिंग केली जाते. कॅम्प भागातील एम.जी. रोड, तुळशीबाग, एफ.सी. रोड हे भाग स्ट्रीट शॉपिंगसाठी ओळखले जातात. अशातच पुण्यातील एम. जी. रोडवरील नामांकित चप्पल दुकानात दोन मायलेकींनी आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून तब्बल १७ हजार रुपयांचा माल फुकट घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिनाज मुर्तजा शेख (वय 40) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय 19, दोघी रा. कोंढवा) या दोघी मायलेकीनं बनावट ओळखपत्र दाखवून दुकानात विश्वास संपादन केला आणि १७ हजार रुपयांचा चप्पलचा माल फुकट घेतला. या प्रकरणी आता मायलेकींना अखेर लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय प्रकरण?
१३ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास आरोपी मिनाज शेख आयपीएस अधिकारी असल्याची ओळख दाखवून तिची मुलगी रिबा सोबत एम. जी. रोडवरील एका नामांकित चप्पल दुकानात गेली. आणि तिने घरातील कार्यक्रमाचे कारण सांगत तब्बल १७ हजारांच्या चप्पल आणि बूट घ्यायला सुरवात केली. त्यानंतर तिने दुकानातील एका कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ असं सांगत दोघींनी तिथून पळ काढला. पैसे न देता त्यांनी तब्बल १७ हजार रुपयांचा माल घेऊन पळून गेल्या.
घटनेनंतर दुकानदाराने तत्काळ लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. लष्कर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासता आरोपींच्या हालचाली स्पष्टपणे दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी १ आणि २ ऑक्टोबर रोजी लष्कर पोलिसांनी दोघींना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?
-आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी
-तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल
-अंतिम प्रभाग रचना जाहीर, आता आचारसंहिता कधी? चंद्रकांतदादांनी थेट तारीखच सांगितली
-मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ‘या‘ प्रभागात झाले बदल














