पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची लगबग सुरू असतानाच पुणे जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून पालकांना मोठा धक्का दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४५ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले असून, यामध्ये पुणे ग्रामीणमधील २४, पुणे महानगरपालिकेतील १२ आणि पिंपरी-चिंचवडमधील ९ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुळशी तालुक्यात सर्वाधिक ९ बोगस शाळा आढळल्या आहेत. यातील अनेक शाळांकडे शासनाची कोणतीही मान्यता नाही, तरीही त्या अधिकृत असल्याचे भासवून पालकांची फसवणूक करत आहेत.
आपल्या मुलाचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी ही यादी तपासण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. या यादीतील धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामीण भागातील २४ पैकी १३ शाळांकडे साधी प्राथमिक मान्यताही नाही. उर्वरित ११ शाळांकडे कागदोपत्री मान्यता असली तरी, त्या मंजूर जागेवर न भरता इतरत्र अनधिकृतपणे स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.
काही शाळांनी तर केवळ ‘इरादा पत्र’ (Letter of Intent) मिळालेले असतानाही पूर्ण मान्यता असल्याचे सांगून प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अशा बोगस शाळांवर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले असून, पालकांनी भूलथापांना बळी न पडता शाळेच्या अधिकृत मान्यतेची खातरजमा करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुण्यातील बोगस शाळांची यादी
- न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलिस स्टेशन जवळ विमलविहार समोर, चितामणी नगर,
- महात्मा गांधी प्रशाला प्लॉट नं.५२, लेन नं.२B संजय पार्क, येवलेवाडी, पुणे
- टीएम तखवा इस्लामिक स्कूल अँड मदरसा, स.न. ७०/१/१, NIBM रोड कोंढवा बु पुणे-४११०४८
- सेंट क्यूटू इंटरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
- इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड हडपसर पुणे-२८
- आनंदाशा अकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोणीकालभोर पुणे
- एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल मानाजी नगर नरे, पुणे
- लेजसी हाय स्कूल अशोक नगर कोंढवा बु पुणे
- शिवाली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अशोक नगर कोंढवा बु पुण
- ऑलिव्ह व इंटरनॅशनल स्कूल, उंडी ता. हवेली पुणे
- ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोसरवाडी कोंढवा पुणे
- ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, औंधवा बु पुणे
- आयर्न वर्ल्ड स्कूल, उंडी पुणे
महत्वाच्या बातम्या-
-‘राजभवन रोड’ विस्तारीकरणाला गती! औंध-पाषाणमधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार














