Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; आचारसंहिता लागू होताच बड्या नेत्यानं सोडली साथ

by News Desk
November 5, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल मंगळवारी वाजले. निवडणुकांची घोषणा होताच अवघ्या २४ तासांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला. आचारसंहिता लागू झाल्यावर बड्या नेत्याने पवारांची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर पुण्यात ताकदवान देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गुरुवारी चाकण येथील शिवसेना मेळाव्यात हा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सातत्याने धक्के बसत असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडले आहे. अतुल देशमुखांसह नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत सामील होणार आहेत. खेड तालुक्यात मजबूत पकड असलेले अतुल देशमुख एक वर्षापूर्वी राष्ट्रवादीत आले होते; मात्र पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक समीकरणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपालिकेतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह कार्यकर्तेही त्यांच्यासोबत धनुष्यबाण स्वीकारतील. यामुळे शिंदे शिवसेनेला उत्तर पुण्यात बळ मिळेल, तर राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच नुकसान सोसावे लागेल.

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकापाठोपाठ धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यासह राज्यभरात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दिग्गज नेते पक्ष सोडून जात आहेत. यापूर्वी ठाण्यातील सात माजी राष्ट्रवादी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता, तर आता अतुल देशमुखांसारख्या स्थानिक नेत्याचा निर्णय पवारांसाठी मोठा धक्का आहे.

विशेषतः अमोल कोल्हे यांचे खंदे समर्थक असलेले अतुल देशमुख हे स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारीची तयारी करत होते. आचारसंहिता लागू होताच २४ तासांच्या आत हा निर्णय घेण्यात आल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…

-पुण्यात पुन्हा आंदेकर-कोमकर गँगवॉर; गुन्हेगारीला लगाम घालण्यात पोलीस अपयशी

-शहरात उभारले जाणार नवीन एसटीपी प्रकल्प, स्थायीने दिली १ हजार २२३ कोटींच्या निविदेला मंजुरी

-फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

-बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

Tags: mahapalika Electionncppune newssharad pawarअतुल देशमुखपुणेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…

Next Post

मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

Recommended

तक्रारवाडीतील बारामती-राशीन रोडलगतचे अतिक्रमण कधी निघणार? तरुणांनी दिला उपोषणाचा इशारा

February 9, 2025
‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण

March 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved