Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप; प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!

by Team Local Pune
April 20, 2026
in Pune, पुणे शहर
२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप;  प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कथित २ हजार कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आधीच एसीबीच्या चौकशीला अडथळा आणणारे आयुक्तांचे आदेश रद्द करत कठोर भूमिका घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत वाघमारे यांना मोठा धक्का दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुमति याचिका (SLP) फेटाळून लावत कोर्टाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोणतेही ठोस कारण नाही. त्यामुळे आता एसीबीची चौकशी अधिक वेगाने आणि निर्बंधांशिवाय पुढे जाणार आहे. २०१६ मध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲड. तानाजी गंभीरे यांनी वाघमारे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. १९९४ पासून पालिकेत कार्यरत असलेले वाघमारे २००३ पासून शहर अभियंता आणि इमारत परवाना विभागाचे प्रमुख होते. या काळात पदाचा गैरवापर करून त्यांनी पत्नी, नातेवाईक आणि बांधकाम कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे २ हजार कोटींची बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

एसीबीच्या प्राथमिक चौकशीतही अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. मात्र, २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्तांनीच एसीबीची खुली चौकशी रोखत वाघमारे यांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्तांची ही भूमिका बेकायदेशीर ठरवत स्पष्ट शब्दांत फटकारले होते. न्यायालयाने आयुक्तांनी अधिकाराचा गैरवापर करून ‘मिनी ट्रायल’ चालवल्याचेही नमूद केले होते. तसेच, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कलम १७ए लागू होत नसल्याचे स्पष्ट करत एसीबीला मुक्तपणे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा नाकारल्यामुळे वाघमारे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एसीबीकडून आता या प्रकरणात वेगाने कारवाई होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने चौकशीला हिरवा कंदील दिला, आणि आता सुप्रीम कोर्टानेही तो निर्णय कायम ठेवला, त्यामुळे २ हजार कोटींच्या प्रकरणात वाघमारे यांची अडचण आणखी वाढली आहे.

Tags: Prashant WaghmarePune corruption casePune Municipal CorporationSupreme Court India
Previous Post

ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!

Next Post

कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

Team Local Pune

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

Recommended

Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

पुण्यात पुढील ४ दिवस पावसाची जोरदार शक्यता; हवामान खात्याने दिले अपडेट…

May 20, 2024
Sunny Nimhan

नगरसेवक सनी निम्हणांच्या पाठपुराव्याला यश, ‘राजभवन’ रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच गती मिळणार

April 1, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved