Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

by News Desk
February 26, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील भीषण विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी VSR व्हेंचर्स आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, या अपघाताबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून, सखोल तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) पुणे यांच्यामार्फत सुरू आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी राज्य CID कडे पाठवण्यात आला आहे.

दुसरीकडे, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर आज (२६ फेब्रुवारी) रोहित पवार बारामती पोलिस ठाण्यास हजारो समर्थकांसह पोहोचले. सोबत वकिलांची फौजही आहे. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब करत असल्याने बारामतीकरांचा आक्रोश पोलिस ठाण्यात दिसून आला. “मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं?” अशी हताश प्रतिक्रिया समर्थकांनी दिली.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

समर्थकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “राजकारण इतकं खराब केलंय की माणसात माणूस ठेवला नाही,” अशा शब्दांत समर्थकांनी मुख्यमंत्र्यांवर राग व्यक्त केला. “अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, देहातला आत्मा निघून गेलाय, आमच्या देवाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी भावना समर्थकांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांनी आरोप केला की, DGCA व्हीएसआर कंपनीला ‘क्लिन चिट’ देण्याचा प्रयत्न करत आहे. विमानाची उड्डाणयोग्यता तपासणे ही DGCA ची जबाबदारी असून, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या DGCA अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. DGCA ने व्हीएसआरच्या पाच विमानांना उड्डाणबंदी घातली होती, ज्याचा अर्थ ही कंपनी अपघातास जबाबदार होती, असा दावा रोहित पवार यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की, पुढील आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर केंद्र सरकारने अजित पवार यांचा अपघात आणि झारखंडमधील एअर ॲम्ब्युलन्स अपघात या दोन्ही घटनांवर अधिकृत विधान करावे. या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, भविष्यात अपघातमुक्त हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सखोल तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. DGCA ने व्हीएसआर व्हेंचर्सची विमाने जमिनीवर उतरवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले, मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

-अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

-औंध-बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

-‘अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण व्हावे’; राघवेंद्र मानकरांची महापौरांकडे मागणी

Tags: ajit pawarCIDDGCARohit Pawarअजित पवारडीजीसीएरोहित पवारसीआयडी
Previous Post

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

Next Post

भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
Next Post
भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

Recommended

छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो

छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो

March 26, 2025
GBS Pune

पुण्यात जीबीएसचा धोका वाढतोय; आणखी एका रुग्णाचा मृत्यू

February 11, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved