Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!; जाणून घ्या दत्त जयंतीचे महत्व आणि पूजाविधी

by News Desk
December 13, 2024
in सांस्कृतिक
Dattaguru
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

दत्त जयंती : दत्त जयंती ज्याला आपण दत्तात्रय जयंती असे देखील म्हणतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार मार्गशीष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मार्गशिर्ष महिन्यातील चंपाषष्ठीनंतर येणाऱ्या या दत्त जयंतीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर साक्षात ब्रह्मा, विष्णु महेश्वरांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांचा जन्म झाला आहे. म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. येत्या १४ डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे.

दत्त जयंतीचे महत्व-

दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून दत्तात्रय हा शब्द बनला आहे. दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त आणि आत्मा आहोत, अशी अनुभूती ज्याला आहे असा तो म्हणजे दत्त…आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र तसेच विष्णूचा अवतार आहेत, असा बोध होतो. दत्त जयंतीला ७ दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह देखील असे म्हणतात. दत्त जयंतीला भगवान दत्ताची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णु, महेशाच्या उपासनेचे फळ आपल्याला मिळते. कारण भगवान दत्ताला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते.

You might also like

‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

दत्त जयंती दिवशी पूजा कशी करावी?

धार्मिक मान्यतेनुसार दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्तात्रेयासह लक्ष्मी-नारायणाची देखील पूजा केली जाते. या पूजेमुळे धनसंपत्तीत वाढ होते. दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते.

दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा.

आपले देवघर स्वच्छ करुन त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.

दत्ताच्या मुर्तीचा गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा. फुले वाहावीत. धूपदिप, अगरबत्ती लावावी.

देवाला नैवेद्य अर्पण करुन गुरुचरित्राचे पारायण किंवा दत्ताच्या मंत्राचा जप करावा. श्री दत्ताची आरती म्हणावी. गोड प्रसाद करुन आरतीनंतर सर्वांना द्यावा.

दत्त जयंतीचा अमृत काळ?

मार्गशिर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या तिथीला दत्त जयंती असते. शनिवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५९ मिनिटांनी पौर्णिमा सुरु होणार असून रविवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथीनुसार अमृतकाळ सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनंतर सुरु होणार आहे. त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी अमृतकाळात आपण दत्ताची पूजा आरधना करु शकतो.

Tags: Amrut KalDatta JayantiMargshirshअमृत काळदत्त जयंतीमार्गशिर्षमुहूर्त
Previous Post

श्री स्वामी समर्थ: स्वामींचे ‘हे’ उपदेश बदलून टाकतील तुमचं जीवन

Next Post

Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन
Pune

‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

by News Desk
May 4, 2026
साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी
Uncategorized

साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा, पुण्यात ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या’ प्रमुखांची पत्रकारांना अरेरावी

by News Desk
January 31, 2026
६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी
पुणे शहर

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

by News Desk
January 13, 2026
श्री उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपती बाप्पाला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य
Pune

श्री उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपती बाप्पाला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य

by News Desk
October 25, 2025
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by News Desk
September 29, 2025
Next Post
Omkareshwar Bridge

Pune: नदीपात्रातील 'तो' पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?

Recommended

प्रसादाच्या नावाखाली कडू पाणी पाजलं अन् गुंगी आलेल्या महिलेसोबत…; वासनांध अशोक खरातचा धक्कादायक खुलासा

प्रसादाच्या नावाखाली कडू पाणी पाजलं अन् गुंगी आलेल्या महिलेसोबत…; वासनांध अशोक खरातचा धक्कादायक खुलासा

March 19, 2026
‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप

‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप

February 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved