Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रुपाली चाकणकरांना दुहेरी धक्का! ‘भोंदूबाबा’ प्रकरणामुळे अध्यक्षपदाचाही राजीनामा अन् आता भावाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

by News Desk
April 29, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
रुपाली चाकणकरांना दुहेरी धक्का! ‘भोंदूबाबा’ प्रकरणामुळे अध्यक्षपदाचाही राजीनामा अन् आता भावाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून गावोगावचे निकाल समोर येत आहेत. यातच दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या या लढतीत मतदारांनी चाकणकर यांच्या भावाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदूरच्या सरपंच पदासाठी संतोष बोराटे आणि विशाल नरेंद्र थोरात यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्याने ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज होता. मात्र, विशाल थोरात यांनी ही निवडणूक एकतर्फी करत बोराटे यांचा ३०४ मतांनी मोठा पराभव केला. थोरात यांना ८३० मते मिळाली, तर संतोष बोराटे यांना अवघ्या ५२६ मतांवर समाधान मानावे लागले.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

कौटुंबिक पराभवाच्या धक्क्यासोबतच रुपाली चाकणकर यांना राजकीय आघाडीवरही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबा प्रकरणामुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. खरात याच्याशी असलेली जवळीक आणि त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून असलेले नाव, यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. अखेर या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याने त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली.

राज्यातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. या आदेशानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. एकाच वेळी भावाचा पराभव आणि स्वतःचे पद गमवावे लागल्याने चाकणकर समर्थकांमध्ये सध्या शांतता पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस

-विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

-पुण्यात घर घेण्याचा बेस्ट चान्स! ताथवडे म्हाडा ७९२ सदनिकांची मेगा लॉटरी, नोंदणीला सुरुवात लगेच करा अर्ज

-‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी

-पुण्यात बहुतांश भागात अंघोळीलाही उरले नाही घरात पाणी, प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच सुरळीत होणार पाणी पुरवठा

Previous Post

टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस

Next Post

पुणे भाजपमध्ये ‘महिला वॉर’ भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
पुणे भाजपमध्ये ‘महिला वॉर’ भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

पुणे भाजपमध्ये 'महिला वॉर' भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Recommended

PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी

December 27, 2025
Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री

April 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved