Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

by News Desk
May 17, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या NEET-UG २०२६ पेपर लीक प्रकरणात सीबीआयने (CBI) अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. पुण्याच्या वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून, त्या या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांची ‘एक्सपर्ट’ म्हणून नियुक्ती केली होती, ज्यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजीच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश मिळाला होता. या पदाचा गैरवापर करून त्यांनी गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे.

तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. मनीषा मांढरे यांनी एप्रिल २०२६ मध्ये पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून अनेक परीक्षार्थींशी संपर्क साधला होता. स्वतःच्या राहत्या घरी विशेष ‘कोचिंग क्लासेस’च्या नावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांना जमवले आणि तिथे त्यांना प्रत्यक्ष परीक्षेत येणारे बॉटनी व झूलॉजीचे प्रश्न सांगितले. त्यांनी हे प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास आणि पुस्तकात मार्क करण्यास भाग पाडले. ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेत यातील बहुतांश प्रश्न जसेच्या तसे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

सीबीआयने या प्रकरणी आपला तपासाचा फास अधिक घट्ट केला असून, गेल्या २४ तासांत देशभरातील ६ प्रमुख शहरांमध्ये मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईत महत्त्वाचे लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर १२ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून सीबीआयची विशेष पथके देशभरात सक्रिय आहेत. या छाप्यांमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पेपरफुटीचे हे रॅकेट किती मोठे आहे, याची व्याप्ती आता स्पष्ट होऊ लागली आहे.

या हायप्रोफाईल प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील पाच आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, मनीषा मांढरे यांच्यासह दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले आहे. एका तज्ज्ञ शिक्षिकेनेच अशा प्रकारे पेपर फोडल्याने शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. सीबीआय आता या रॅकेटमधील इतर ‘बड्या माशांचा’ शोध घेत असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं

-पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

-पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

-राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं

Next Post

“नराधमांना आता खैर नाही!” प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एल्गार

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Next Post
“नराधमांना आता खैर नाही!” प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एल्गार

"नराधमांना आता खैर नाही!" प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एल्गार

Recommended

Ranveer Alahabadia

रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’

March 3, 2025

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

November 30, 2023

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved