पुणे : राज्यामध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. सोबतच प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचाही कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.
सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याने भाजपमधील दिग्गजांचे टेन्शन वाढणार आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे आगामी धोरणं स्पष्ट केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “यंदा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात तरुण नेत्यांना संधी देणार आहोत. किमान 40 टक्के जागा या 35 वर्षांखालील कार्यकर्त्यांना देण्याचा पक्षाचा निर्णय आहे,” टीव्ही ९ मराठीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीला कात्री लागू शकते. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सारख्या सर्व स्तरांवर हा निर्णय लागू होणार होऊ शकतो. भाजप पक्षामध्ये नवी पिढी घडवण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी देणार असल्याचं यावरून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद, आता महापालिकेला २ कोटी ८१ लाखांचा भुर्दंड!
-रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत
-पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!
-लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा














