Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत

by News Desk
November 22, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : या जगात आजही माणुसकी शिल्लक आहे. याचं उत्तम उदाहरण पुण्यात पहायला मिळालं. सदाशिव पेठेतील कचरा गोळा करणाऱ्या महिलेला पैशांची बॅग सापडली. त्यांनी त्या बॅगेचे मालक शोधले आणि पैशांची बॅग परत केली. सदाशिव पेठेतील २० नोव्हेंबरला सकाळी स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने या नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. फीडर पॉइंटकडे जाताना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वी औषधांच्या बॅगा मिळाल्याचा अनुभव असल्याने तीही तशीच कोणाची तरी असेल या विचाराने त्यांनी ती सुरक्षित ठेवली. पण बॅग उघडताच त्यात औषधांसह दहा लाख रुपये रोख रक्कम असल्याचे लक्षात आले.

गेली २० वर्षे हाच परिसर सांभाळणाऱ्या अंजू ताईंनी घाबरायचे सोडाच, उलट बॅगेचा मालक शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. ओळखीच्या नागरिकांच्या मदतीने परिसरात चौकशी केली. याचवेळी एकजण अतिशय घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधत फिरताना दिसले. अंजू ताईंनी त्यांना बोलावले, पाणी दिले, शांत केले आणि बॅग त्यांचीच असल्याची खात्री करून दहा लाख रुपये जसेच्या तसे परत केले.
बॅगेच्या मालकाने आणि परिसरातील नागरिकांनी अंजू ताईंच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले. साडी आणि काही रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला. “हे पैसे माझे नव्हते, म्हणून परत करणं हे माझं कर्तव्य होतं,” असे त्या म्हणाल्या.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

हा प्रसंग पुन्हा एकदा सिद्ध करतो की, स्वच्छच्या दारोदार कचरा संकलन सेवेमुळे गेल्या दोन दशकांत कचरावेचक आणि पुणेकर यांच्यात विश्वासाची नाती घट्ट झाली आहेत. ४० लाख पुणेकरांना सेवा देणाऱ्या ४००० स्वच्छ कचरावेचकांमधला हाच प्रामाणिकपणा त्यांना नागरिकांच्या मनात खऱ्या अर्थाने “घर” करून देतो!

घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता दूत अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली दहा लाखांची रोख रक्कम असलेली बॅग कोणताही स्वार्थ न ठेवता मूळ मालकाकडे परत केली. त्यांच्या या कृतीने प्रामाणिकतेचं प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे. अंजू माने यांच्या या प्रामाणिकतेबद्दल आमदार हेमंत रासने यांनी पेढे भरवून आणि भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. तसेच “स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा” अभियानाला नवी दिशा देत, अंजू माने यांना ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि प्रामाणिक कसबा’ या अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

-लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा

-यंदा स्वस्तात घराचं स्वप्न साकारण्याची शेवटची संधी, म्हाडानं दिली अर्जासाठी मुदतवाद

-‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश

-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली मतदार यादी, तुमचे नाव आहे का? चेक करा

Tags: Anju ManeGarbageKasbapuneSadashiv Pethअंजू मानेकचराकसबापुणेपैसे
Previous Post

पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

Next Post

भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद, आता महापालिकेला २ कोटी ८१ लाखांचा भुर्दंड!

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Pune Corporation

भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद, आता महापालिकेला २ कोटी ८१ लाखांचा भुर्दंड!

Recommended

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

April 30, 2025
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार

March 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved