Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे महापालिकेत ‘मार्च एंड’ पॅटर्नला धक्का! सुशासनाचा चाबूक चालला; एका आदेशाने माननीयांसह अधिकारी, ठेकेदारांची धावपळ

by News Desk
February 27, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुणे महापालिकेत ‘मार्च एंड’ पॅटर्नला धक्का! सुशासनाचा चाबूक चालला; एका आदेशाने माननीयांसह अधिकारी, ठेकेदारांची धावपळ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आर्थिक वर्ष संपत आल्याने पुणे महापालिकेत दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी–मार्च महिन्यात कामांचा अक्षरशः पूर येतो. विविध विभागांकडून नव्या कामांच्या निविदा काढणे, मंजुरी मिळालेल्या कामांचे वर्कऑर्डर देणे आणि ठेकेदारांची देयके मंजूर करून घेण्यासाठी अधिकारी–ठेकेदारांची धावपळ सुरू असल्याचे चित्र सध्या महापालिकेत पाहायला मिळत आहे. आर्थिक तरतुदी खर्च करण्याच्या घाईत अनेकदा कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची तसेच मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय होत असल्याची टीका होते.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर भूमिका घेत १ मार्चनंतर कोणत्याही नव्या कामांच्या निविदा मागवू नयेत तसेच कार्यादेश काढू नयेत, असे स्पष्ट आदेश सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात पूर्ण झालेल्या कामांची सर्व देयके १५ मार्चपर्यंत मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर करावीत, त्यानंतर कोणतीही देयके स्वीकारली जाणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या घाईगडबडीला आळा बसल्यास कामांच्या दर्जात सुधारणा होऊ शकते तसेच निधी खर्च करण्याच्या नावाखाली होणारी पुणेकरांच्या करातून गोळ्या होणाऱ्या पैशाची देवाणघेवाण आणि मनमानी कारभारावरही नियंत्रण येऊ शकते. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढवून जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय प्रशासनासाठी आदर्श ठरू शकतो.

महापालिका निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचीत भाजप नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत “पुणेकरांनी दिलेला जनादेश हा सत्तेचा माज मिरविण्यासाठी नाही, तर जबाबदारी उचलण्यासाठी आहे. महापालिका हा व्यवसाय नाही, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे तुम्ही गैरकारभार, उन्माद केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही,” अशा कठोर शब्दात सुनावले होते. त्यामुळे आयुक्तांनी आत्ता घेतलेला निर्णय म्हणजे फडणवीस यांनी दिलेल्या सुशासनाच्या शब्दाची महापालिकेत सुरुवात करणारा असल्याचे दिसत आहे.

काही विभागांकडून निविदेनंतर शिल्लक राहिलेल्या ‘बिलो रक्कमेतून’ नव्याने कामे लावणे किंवा देयके अदा करण्याचे प्रकार होत असल्याचे अर्थसंकल्प तयार करताना निदर्शनास आले होते. हा प्रकार आर्थिक शिस्तीचा भंग करणारा असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करू नयेत, अथवा मान्यतेसाठी पाठवू नयेत, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

मात्र, या निर्णयामुळे वर्षाअखेरीस सुरू असलेली तातडीची किंवा लोकहिताची कामे थांबण्याची शक्यता आहे. काही विकासकामांचे कार्यादेश पुढील आर्थिक वर्षात ढकलले जाऊ शकतात, ज्यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत विलंब होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक शिस्त राखतानाच तातडीच्या व सार्वजनिक हिताच्या कामांना अपवादात्मक तरतूद देण्याची मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना ठेकेदारांऐवजी महापालिकेकडूनच राबवणार; ४ कोटींचा खर्च वाचणार

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

Tags: March End SpendingNaval Kishore RamPMC Budget 2025-26PMC UpdatePune Development NewsPune LocalPune Municipal Corporationpune newspune politicsPune Tenders
Previous Post

राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना ठेकेदारांऐवजी महापालिकेकडूनच राबवणार; ४ कोटींचा खर्च वाचणार

Next Post

खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी

खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी

Recommended

Pune Plice

पोलिसांच्या मेगा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची इनसाईड स्टोरी; तरुणी विश्वासाने पोलिसांत गेली पण त्यांनी चौकीतच केला सौदा?

February 12, 2026
Ajit Pawar

राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

January 3, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved