Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पोलिसांच्या मेगा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची इनसाईड स्टोरी; तरुणी विश्वासाने पोलिसांत गेली पण त्यांनी चौकीतच केला सौदा?

by News Desk
February 12, 2026
in Pune, पुणे शहर
Pune Plice
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात घडलेल्या एका अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटनेमुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलिस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी ही तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. मात्र, मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती, त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली.

या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी या प्रकरणाची दखल घेत फरासखाना पोलिस ठाण्यात तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. “अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेने पुणे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी पोलिस दलाने तात्काळ कठोर कारवाई आणि आंतरिक चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तरुणीच्या सुरक्षिततेसाठीही पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी

-‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

-निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन

-बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!

-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

Tags: Budhwar PethpunePune Plice
Previous Post

महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी

Next Post

सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात ‘दादांचा’ शिरस्ता पाळणार; कार्यकर्त्यांसाठी घेतला खास निर्णय

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune

सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात ‘दादांचा’ शिरस्ता पाळणार; कार्यकर्त्यांसाठी घेतला खास निर्णय

Recommended

Pune Crime

पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?

March 6, 2025
Yugendra Pawar And Ajit Pawar

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?

October 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved