पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी ( ता. ९ ) रोजी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा बंद असणार आहे. तरीही नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन महापिलाका प्रशसानाकडून करण्यात आले आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व स्थापत्य विषयक कामे होणार असल्याने गुरुवार शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. प्रभावित भागांमध्ये सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकारनगर आदींचा समावेश आहे.
‘या’ भागात पाणीपुरवठा बंद असणार
पर्वती एमएलआर टाकी : गुलटेकडी, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट रस्ता परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडिअम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर
पर्वती एचएलआर टाकी : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर आणि लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी सर्वे क्रमांक ४२, कोंढवा खुर्द, साईबाबानगर,
पर्वती एलएलआर टाकी : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर ते खराडी परिसर : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर चौधरी वस्ती, सातव वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, गतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी परिसर.
लष्कर जलकेंद्र भाग : संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रिअल क्षेत्र, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रूक, शेवाळवाडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण बाजू, संपूर्ण हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर (टँकरद्वारे पाणी बंद असणार), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.
चतुः श्रृंगी टाकी : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर,
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग : मुळा रस्ता, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर : गणराज चौक, पॅनकार्ड रस्ता, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.
जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठल नगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रस्त्याचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती
-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध
-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड
-शॉपिंगसाठी कायपण! बनावट IPS अधिकारी ओळखपत्र, अन् १७ हजारांच्या फुकट चप्पल
-पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?














