Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध

by News Desk
October 6, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून चांगलंच उधाण आलं आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत बोलताना सुरेंद्र पठारेंनी स्वत: भाजपमध्ये जाणार ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चेला जोर आला आहे. यावरुन भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘वारे बदलले की पक्ष बदलणाऱ्यांना संधी मिळते, पण वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचं काय?’ असा सवाल स्थानिक नेते विचारत आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. अलीकडेच वडगाव शेरीतील शिष्टमंडळाने शहराध्यक्षांची भेट घेत, ‘बाहेरील लोकांना घेऊ नका; स्थानिक निष्ठावंतांना संधी द्या’, अशी मागणी केली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहोत. बाहेरील लोकांना घेतल्यास आमचं मनोबल खचेल. पक्षाने भूमिका स्पष्ट करून निष्ठावंतांना विश्वास द्यावा’, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शहराध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.  आता सुरेंद्र पठारेंचा पक्षप्रवेश झाला तर पुणे भाजपची राजकीय समीकरणं बदलणार हे नक्की. त्यामुळे आता सुरेंद्र पठारेंचा पक्षप्रवेश होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड

-शॉपिंगसाठी कायपण! बनावट IPS अधिकारी ओळखपत्र, अन् १७ हजारांच्या फुकट चप्पल

-पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?

-आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

-तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल

Tags: MLA Bapusaheb PatharePalika ElectionpuneSurendra Pathareआमदार बापूसाहेब पठारेपालिका निवडणूकपुणेसुरेंद्र पठारे
Previous Post

गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड

Next Post

‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

'माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी...' पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

Recommended

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

May 14, 2024
सावधान! पुण्यात डेंग्यूचा धोका वाढतोय; वाचा काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?

May 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved