पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांना १० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील यांच्याविरोधात पोस्ट केल्याच्या रागातून गुंड पाठवून अमानुष मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात त्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होत्या.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच माधवी खंडाळकर यांनी यू-टर्न घेतला. त्यांनी दुसरा व्हिडीओ टाकत “चुकीने व्हिडीओ पोस्ट झाला, आम्ही जुन्या ओळखीच्या आहोत, गैरसमजातून वाद झाला, तो कुटुंबीयांमध्ये मिटवत आहोत, यावर राजकारण करू नये” असे स्पष्टीकरण दिले. मात्र नंतर त्यांनी पुन्हा दावा केला की, माफीचा व्हिडीओ रुपाली पाटील यांनी बळजबरीने करून घेतला.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मारहाणीचा आरोप केला त्या दिवशी त्या बीड येथे होत्या, त्यामुळे असा प्रकार घडणे शक्यच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा कट असल्याचा दावा करत त्यांनी माधवी खंडाळकर यांना वकिलांमार्फत १० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद उघड झाला असून, तो आता कायदेशीर लढाईत रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत. रुपाली पाटील यांच्या समर्थकांनीही माधवी खंडाळकर यांच्यावर खोट्या आरोपांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू
-सनी निम्हणांना राज्य सरकारची मोठी जबाबदारी; युवा धोरण समितीवर वर्णी!
-पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप, भाजप नेत्याचे थेट आयुक्तांना पत्र
-ब्राह्मण समजासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारचे खास योजना; ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर कसा लाभ मिळणार?
-पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘मेरिट सर्व्हे’ची धूम; दिग्गजांचे तिकीट कापण्याची दाट शक्यता














