पुणे : पर्वती येथील शाहू वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला (एसआरए) उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. नागरिकांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून, आता वसाहतीचा स्वयंपुनर्विकास होणार आहे. अखिल शाहू वसाहत बचाव कृती समितीने ही माहिती दिली आहे.
गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ स. नं. ९२ व ९३ येथील फायनल प्लॉट्सवर पक्क्या दुमजली घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बिल्डर आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने धमकावले जात होते. झोपडपट्टी घोषित करण्याचा प्रयत्न, खोट्या सह्या आणि टीडीआरमधील भ्रष्टाचारासाठी दहशत निर्माण केली जात होती. रहिवाशांनी स्टॅम्प पेपरवर विरोध नोंदवला तरीही त्यांना एसआरएमध्ये सामील करण्याचा दबाव होता. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांच्या मार्गदर्शनाने नागरिकांनी शासनाकडे दाद मागितली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व बाबी तपासून अन्याय होणार नाही अशी ग्वाही देत एसआरएला स्थगितीचे आदेश दिले. आता रहिवाशांनीच स्वयंपुनर्विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, एकजुटीच्या लढ्याचे फलित समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुस्तकांवरील जीएसटी कमी करा’; मंत्री मुरलीधर मोहोळांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदन
-चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…
-जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार पुढे का येत नाहीत? अजित पवार म्हणाले, ‘त्याच्या बापाने…’
-पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…
-‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं














