Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत, सेटिंग करू नका’; रविंद्र चव्हाणांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंना तंबी

by News Desk
January 3, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत, सेटिंग करू नका’; रविंद्र चव्हाणांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंना तंबी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना थेट तंबी दिली. “पॅनेलच्या बाहेर जाऊन कोणी प्रचार करू नये. प्रत्येकाने पॅनेलमध्ये प्रचार करावा. शायनिंग मारत बसू नये. चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत. सेटिंग करू नका,” असे स्पष्ट आदेश रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) मधून काटे निवडणूक लढवत असल्याने ही तंबी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रचारप्रमुख नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली त्या प्रभागात पॅनेल आहे. शत्रुघ्न आणि नाना काटे यांनी यंदाही समोरासमोर लढण्याचे टाळले आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची तंबी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षांतर्गत शिस्त आणि पॅनेल विजयावर भर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

निगडी येथे बोलताना चव्हाण यांनी भाजपची विचारधारा पारदर्शकतेची असल्याचे सांगितले. “वर्षानुवर्षांचा कारभार जनतेने पाहिला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटीमध्ये समावेश, पायाभूत सुविधांमध्ये बदल, वाहतूक कोंडी दूर करणे – हे केंद्र आणि राज्य सरकारचे योगदान आहे,” असे ते म्हणाले. विकास आणि हिंदुत्व ही दोन्ही चाके एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला.

“हिंदू आहे हे म्हणायला अंगात रग लागते, ती भाजपशिवाय कोणत्याही पक्षात नाही,” असे ठणकावून सांगत चव्हाण यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मतांच्या राजकारणापेक्षा विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रविंद्र चव्हाण यांच्या तंबीने पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न दिसतो. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षांतर्गत समन्वय आणि पॅनेल विजयावर भर देण्यात येत आहे. या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विद्यार्थ्यांसाठी कटिबद्ध आबा बागुल: प्रभाग ३६ मध्ये ई-लर्निंग स्कूलची ग्वाही

-प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?

-अजित पवारांना पिंपरी महापालिकेत धक्क्यावर धक्के, भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून

-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत

Tags: NigadiPalika ElectionPimpri ChinchwadpunePune Cityनाना काटेनिगडीपिंपरी चिंचवडपुणेपुणे पालिका निवडणूकशत्रुघ्न काटे
Previous Post

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सदैव कटिबद्ध, आबा बागुलांच्या प्रयत्नामुळे गरिबांची मुलंही जागतिक दर्जाच्या ई लर्निंग स्कूलमध्ये

Next Post

राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Ajit Pawar

राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा, भाजपची तडीपारीची मागणी; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Recommended

गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?

गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?

May 14, 2024
काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

काँग्रेसला मोठा धक्का: संजय जगताप भाजपच्या वाटेवर, पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

July 12, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved