पुणे : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर-पद्मावती) मधून शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलमधील बाळासाहेब उर्फ मच्छिंद्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस यांना प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांनी संपूर्ण पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
आबा बागुल यांनी शिक्षणाबाबत ठाम ग्वाही दिली. “शिक्षण हे सर्वांनाच मिळावे, वंचित घटकातील मुलेही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत,” यासाठी देशात प्रथमच स्व. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलची उभारणी केली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रत्येक प्रभागात ई-लर्निंग स्कूल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आबा बागुल यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या या प्रतिसादाने प्रभागातील शिवसेना पॅनलचा विजय निश्चित असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?
-अजित पवारांना पिंपरी महापालिकेत धक्क्यावर धक्के, भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून
-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत
-भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात














