पुणे : पुणे शहरात दसरा मोठ्या उत्सहात साजरा झाला. मात्र याच पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या जन्मदात्र्याचा खून केल्याचे समोर आले आहे. कोथरूड परिसरातील जय भवानीनगरमध्ये ही घटना घडली आहे. वडिलांनी ‘टिव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात औषध सोड’, असं सांगितलं यावरुन बाप-लेकात टोकाचा वाद झाला अन् या वादातून मुलाने त्याच्या वडिलांचा खून केला. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेलं आहे.
तानाजी पायगुडे (वय ७२, रा. कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भवानी नगरमध्ये राहणाऱ्या पायगुडे कुटुंबात झालेल्या वादातून मुलाने वडिलांचा खून केला. गुरुवारी दुपारी १२ वाजता सुमारास सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडिलांनी त्याला टीव्ही बंद करून स्वतःच्या डोळ्यात औषधाचे ड्रॉप्स टाकण्यास सांगितले.
वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा राग अनावर झाला त्याने वडिलांशी वाद घातला. वादातून सचिनने घरातील चाकूने वडील तानाजी यांचा गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार केले. पोटमाळ्यावरील आरडाओरडा ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन या पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा तानाजी पायगुडे हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सचिनला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर पसार झालेला आरोपी सचिन याला वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोलिसांनी बँक खाती गोठवताच निलेश घायवळची पत्नी अन् मुलगा भारतात पाठवलं
-‘निलेश घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का?’ धंगेकरांच्या प्रश्नाने महायुतीत ठिणगी
-एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट
-पुण्यात गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनंं रिक्षाचालकाला उडवलं; रिक्षाचालकासह ३ जण जखमी
-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद














