Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘निलेश घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का?’ धंगेकरांच्या प्रश्नाने महायुतीत ठिणगी

by News Desk
October 1, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ravindra Dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील पोलीस यंत्रणेला चकमा देऊन लंडनला पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे आता महायुतीत अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? यावरुन सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चंद्रकांत पाटील या प्रकरणावर गप्प का आहेत, असा थेट सवाल धंगेकर यांनी विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यमुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना निलेश घायवळ प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘निलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का आहेत? ते या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत?’ असे प्रश्न रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. ‘निलेश घायवळवर राजकीय वरदहस्त आहे. त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळू शकतो? पोलिसांची चौकशी व्हायला हवी. मग घायवळला कोण मदत करत आहे, हे समोर येईल. मी आता सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणारा आहे. मी पुणेकरांचे प्रश्न मांडणारा आहे’, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हणाले आहेत.

हत्या, अपहरण, खंडणी, अवैधरित्या शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असूनही घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. एरवी सामान्य लोकांना पासपोर्ट देताना त्यांची कसून पडताळणी केली जाते. मग निलेश घायवळ प्रकरणात पासपोर्ट कार्यालय आणि नगर पोलिसांना त्याचे गुन्हेगारी चारित्र्य खटकले नाहीत का? असा सवालही उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट

-पुण्यात गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनंं रिक्षाचालकाला उडवलं; रिक्षाचालकासह ३ जण जखमी

-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

-स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

-वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची माहिती; न्यायलायने ‘त्या’ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

Tags: Chandrakant PatilRavindra Dhangekarचंद्रकांत पाटीलरविंद्र धंगेकर
Previous Post

एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट

Next Post

पोलिसांनी बँक खाती गोठवताच निलेश घायवळची पत्नी अन् मुलगा भारतात पाठवलं

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पोलिसांनी बँक खाती गोठवताच निलेश घायवळची पत्नी अन् मुलगा भारतात पाठवलं

पोलिसांनी बँक खाती गोठवताच निलेश घायवळची पत्नी अन् मुलगा भारतात पाठवलं

Recommended

Milk

सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले

March 15, 2025
नाव ‘स्पा सेंटर’ पण आत सुरु होता वेगळाच कारभार, पुण्यातील उच्चभ्रू भागात पोलिसांची धाड

April 3, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved