पुणे : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी पुणे जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या १७ नगरपरिषद-नगरपंचायती मतदारसंघांमध्ये ही सुट्टी लागू राहील. केंद्र शासन, निमशासकीय कार्यालये, बँका आणि खासगी आस्थापनांनाही ही सुट्टी असणार आहे.
कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असणाऱ्या पात्र मतदारांनाही ही सुट्टी लागू राहणार असल्याने कोणालाही मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व मतदारांना “घरातून बाहेर पडा, मतदान करा आणि लोकशाही बळकट करा” असे आवाहन केले आहे. २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होणार हे निश्चित!
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश, महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत मोठा निर्णय!
-ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-महाज्योतीची कागदपत्र तपासणी पुण्यात व्हावी; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
-महापालिका निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं वाचा सविस्तर…














