पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे गृहनिर्माण मंडळाकडून विविध गृहनिर्माण योजनांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीतील अर्ज भरण्याची मूळ अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ असली, तरी नागरिकांच्या प्रतिसादानुसार ती वाढवून २१ नोव्हेंबर २०२५ करण्यात आली होती.
दरम्यान, अनेक अर्जदारांना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांच्या पडताळणीतील विलंब तसेच कागदपत्रांची अपूर्णता यामुळे अतिरिक्त वेळ देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. नागरिकांकडून आलेल्या या मागण्या आणि सोडतीस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून मंडळाने आता शेवटची आणि अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश
-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली मतदार यादी, तुमचे नाव आहे का? चेक करा
-मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा
-कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू
-सनी निम्हणांना राज्य सरकारची मोठी जबाबदारी; युवा धोरण समितीवर वर्णी!














