पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ पुणे पोलिसांना चकवा देत युरोपमध्ये गेला होता. मोठमोठ्या गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या गुंडाला भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळाला? याची चौकशी सुरु असून आता त्याचे मुलगा आणि पत्नी भारतात परतले आहेत. पोलिसांनी घायवळची १० बँक खाती गोठवली आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांत निलेश घायवळचा मुलगा आणि पत्नी भारतात परतले आहेत.
मात्र, निलेश घायवळ अद्याप युरोपमध्येच असल्याची माहिती आहे. त्याने ९० दिवसांचा व्हिसा घेऊन प्रवास केला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘लूक आऊट नोटीस’ जारी केली असल्याने, त्याला कोणत्याही वेळी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घायवळची पत्नी आणि मुलगा भारतात परतले तरी ते अद्याप पुण्यात दाखल झाले नसल्याची माहिती मिळत आहे.
पोलिस चौकशीच्या भीतीने ते शहराबाहेरच थांबले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पार्श्वभूमीवर, घायवळ टोळीकडून कोथरुडमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील गुंडांना अटक केली होती. तसेच, घायवळच्या निवासस्थानावर छापा टाकून दोन चारचाकी वाहने आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. पोलिस या प्रकरणात सतर्क असून, घायवळच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘निलेश घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का?’ धंगेकरांच्या प्रश्नाने महायुतीत ठिणगी
-एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट
-पुण्यात गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरनंं रिक्षाचालकाला उडवलं; रिक्षाचालकासह ३ जण जखमी
-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-स्पा सेंटरच्या नावाखाली ‘सनशाईन’मध्ये सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी छापा टाकला अन्…














