पुणे : पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळ्यापूर्वी एक अनपेक्षित अशी घटना घडली आहे. महाविद्यालयातील या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर एकाच मंचावर उपस्थित राहणार होते. मात्र, कार्यक्रमापूर्वी मंचाजवळ एक साप आढळून आल्याने खळबळ उडाली.
हा साप मंचाच्या समोर दिसला आणि नंतर तो मंचाखाली गेला. यामुळे आयोजक आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून मुख्यमंत्र्यांचा ताफा त्याचवेळी घटनास्थळी दाखल झाला होता. साप मंचाखाली लपून बसल्याने मान्यवर मंचावर येण्यापूर्वी सापाला सुरक्षितपणे हटवण्याचे आव्हान यंत्रणेसमोर होते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने पावले उचलली गेली. सर्पमित्रांना बोलावण्यात आले आणि सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही हानी पोहोचली नाही. यंत्रणेने त्वरित घेतलेल्या खबरदारीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून, कार्यक्रम पुढे सुरळीतपणे पार पडण्याची तयारी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम अदानी समूहाला, दीड हजार कोटींची निविदा मंजूर
-पुण्यातील शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण, आक्रमक पालकांची काय भूमिका?
-पबजी खेळताना ओळख, प्रेमाला नकार, त्याने तिचे AI द्वारे अश्लील फोटो बनवले अन् थेट…
-IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अॅप ठरतेय नंबर वन!
-गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी














