Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवांतर्गत तिसरी ‘पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन’; रन फॉर अमृतकालमध्ये १७ हजार धावपटू सहभागी

by News Desk
March 6, 2026
in Pune, Sports, पुणे शहर, महाराष्ट्र
Sunny Nimhan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसऱ्या पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७ हजार धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि मॅरेथॉन स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ८ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे.

आजच्या तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या ट्वीन सिटींना जोडत आरोग्यदायी जीवनशैलीचा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असे सनी विनायक निम्हण म्हणाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून(टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स)नशा मुक्ती अभियानासाठी एकत्र येणार आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

स्पर्धा कशी असेल?

ही स्पर्धा पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा चार गटांमध्ये धावपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पहाटे ५ वाजता २१.१ किमी, सकाळी ५.४५ वाजता १० किमी, तर ७.१५ वाजता ५ किमी आणि ७.३० वाजता ३ किमी शर्यतींना सुरुवात होणार आहे.

२१.१ किमी शर्यतीचा प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून होऊन आयुका, स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ, ब्रेमेन चौक, परिहार चौक, वेस्टएंड मॉल, औंध मिलिटरी स्टेशन, विशाल नगर मेन रोड, न्यू डीपी रोड, ज्युपिटर हॉस्पिटल मार्गे लक्ष्मी माता मंदिर, ममता चौक, ताम्हाणे चौक, औंध-बाणेर लिंक रोड, नागरस रोड मार्गे पुन्हा वेस्टएंड मॉल, परिहार चौक होत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समाप्त होईल.

१० किमी शर्यतीचा मार्ग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स – आयुका – स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ – ब्रेमेन चौक – परिहार चौक – वेस्टएंड मॉल – नागरस रोड – औंध-बाणेर लिंक रोड – ताम्हाणे चौक आणि पुन्हा विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असा असणार आहे.

या स्पर्धेत एकूण ५,५५,५५५ रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, गुडी बॅग, पदक, ई-टायमिंग प्रमाणपत्र आणि वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे तांत्रिक नियोजन यश रायकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय

-इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद

-आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

-‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

-स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

Tags: Baner-BalewadipuneSunny NimhanSuper Sunny Month
Previous Post

आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय

Next Post

पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…

पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्...

Recommended

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”

March 1, 2024
Temghar Dam

गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी

February 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved