Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

by News Desk
March 5, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपावरून सर्वच पक्षांत चढाओढ सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरात आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आमदार आपल्या मुलाचा बालहट्ट पुरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॅनरमध्ये थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत की, “दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय का? आमदारकी कार्यकर्त्यांच्या कष्टाने मिळाली, पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष आणि आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी घराणेशाहीचाच बालहट्ट का?” असे म्हटले आहे. तसेच, “आमदारसाहेबांच्या भूमिकेमुळे हडपसरमधील पक्षाची झालेली पिछेहाट बाजूला सारून आता साहेबांची लाडक्या लेकासाठी धडपड कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे,” असा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

पोस्टरमध्ये पुढे म्हटले आहे की, “अजितदादांचे कार्यकर्त्यासाठी असणारे प्रेम आणि दादांची काम करण्याची जिद्द बघूनच आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणात आले. परंतु दादांच्या पाठीमागे असे कार्यकर्त्याचे खच्चीकरण करून विधानसभा अध्यक्ष आणि आमदार साहेब काय साध्य करू पाहत आहेत हे समजत नाही.” दादांच्या जाण्याने आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आधीच पोरके झाले आहेत. आता त्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे लोक करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये शेवटी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना विनंती करण्यात आली आहे की, “पार्थदादा आणि वहिनी, तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. आता तुम्हीच दादांसारखंच आम्हाला न्याय द्यावा. पार्थदादा, आम्ही तुम्हाला अजितदादांच्या रूपात बघत आहोत.” या बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अन्यायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत असताना हडपसरमधील ही बॅनरबाजी पक्षातील अंतर्गत असंतोष दर्शवते. आमदार चेतन तुपे यांच्या मुलाला स्वीकृत पद देण्याच्या प्रयत्नांविरोधात निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले असून, यामुळे पक्ष नेतृत्वावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

Tags: ajit pawarCHetan TupePune Palika.अजित पवारचेतन तुपेपुणे पालिका
Previous Post

स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

Next Post

आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

Recommended

धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; नेमकं घडलं काय?

April 15, 2024
Ajit Pawar And Sunil Shelke

अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?

October 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved