Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार

by News Desk
March 6, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी वसंत मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील काही वक्तव्ये हे अपमानास्पद असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची पूर्ण माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक अपमानास्पद वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत मोरे यांनी ‘लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे’ असे म्हटले. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने फिर्यादींची सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण आला आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

तक्रारीत म्हटले आहे की, या व्हायरल व्हिडिओमुळे कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात राहत आहेत. वसंत मोरे यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याने अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असून, त्यामुळे समाजातील त्यांच्या स्थानावर परिणाम झाला आहे. फिर्यादींनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली होती.

शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत वसंत मोरे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी संबंधित व्हिडिओ आणि पत्रकार परिषदेच्या इतर पुराव्यांचा अभ्यास सुरू केला आहे. पुढील तपासात मोरे यांचे वक्तव्य हेतूपूर्ण होते की नाही, याची चौकशी केली जाणार आहे. या घटनेने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार आणि अपमानास्पद वक्तव्यांच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून लवकरच आरोपपत्र दाखल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

-स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

Tags: Vasant More
Previous Post

‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

Next Post

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
War

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद

Recommended

Ganesh Gavhane

‘पोलिसांनी माझ्या भावाला मारल्याच्या रागातून मी…’; आरोपी दत्ता गाडे अटक प्रकरणात नवा ट्वीस्ट, नेमकं काय प्रकरण?

February 28, 2025
“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक

June 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved