पुणे : राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पुणे महापालिकेत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. महापालिका निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेतून हे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसपूस वाढली असून, वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे स्थानिक नेत्यांना शेवटी सेटलमेंट करावे लागल्याची चर्चा आहे. महापालिकेत नव्याने ३२ गावे समाविष्ट करण्यात आली.
या गावांना जवळच्या क्षेत्रीय कार्यालयांशी जोडण्यात आले. यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढले. नगरसेवकांनी हद्दी बदलण्याची मागणी केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन आणि निवडणूक विभागाने लोकसंख्येनुसार नवीन हद्द निश्चित केल्या. यात काही क्षेत्रीय कार्यालयांची नावेही बदलण्यात आली.
नव्या रचनेनुसार १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी १४ भाजपच्या ताब्यात येत आहेत, तर काँग्रेसकडे फक्त एक क्षेत्रीय कार्यालय आले आहे. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक असूनही त्यांना एकही क्षेत्रीय कार्यालय मिळाले नाही. यामुळे भाजपने चालाखीने राष्ट्रवादीचा काटा काढल्याची चर्चा सुरू झाली.
या निर्णयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांनी नगरविकास मंत्रालयाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वेळ पडल्यास क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेत बदल करण्याची सूचनाही दिली.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिकेत १३ प्रभाग समित्या बिनविरोध! राष्ट्रवादीला एक, काँग्रेसला एक अध्यक्षपद
-पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद! हवाई दलाच्या विमानाचा अपघात
-आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?














