Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
in Pune, पुणे शहर
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काकडे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पक्षांतर्गत गोटात चर्चां आणि नाराजीला उधाण आले आहे. पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना डावलून थेट नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांच्या यादीत माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, दीपक मानकर, संजोग वाघीरे, योगेश बहल, रणजीत शिवतारे यांसारखी अनेक अनुभवी आणि स्थानिक पातळीवर मजबूत नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र अंतिम क्षणी विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

विशेष म्हणजे, पक्षाचे कारभारी म्हणून पुढे आलेले खासदार पार्थ पवार यांचे ‘खास’ मित्र असल्यानेच काकडे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे “पक्षनिष्ठेपेक्षा कारभाऱ्यांची जवळीक महत्त्वाची झाली का?”, असा सवाल कार्यकर्त्यांच्या चर्चेतून पुढे येताना दिसत आहे.

“विक्रम काकडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके योगदान काय?” अशी उघडपणे चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी राबणाऱ्यांना प्रतीक्षा आणि नव्या चेहऱ्याला थेट संधी, यामुळे संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढली आहे. “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आज असते तर त्यांनी पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यालाच संधी दिली असती” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली असली तरी खरी कसोटी मतदानाच्या दिवशी लागणार आहे. संघटनेतील नाराजी मतपेटीत दिसते की पक्ष नेतृत्व सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरते, हा पाहणे महत्त्वाचे असणार आहे. सध्यातरी पुणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीपेक्षा नाराजीची चर्चा जास्त रंगतेय हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या-

-Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

-सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

-विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

-भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

-Solapur Vidhanparishad: संख्याबळचे गणित सुटले मात्र उमेदवारीचा तिढा कायम, भाजपमध्ये ज्येष्ठांना संधी की नव्या दमाच्या चेहऱ्याला पसंती!

Previous Post

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

Next Post

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

Recommended

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत

January 9, 2025
Chandrakant Patil

फटाक्यांच्या आतिषबाजी अन् पुष्पवृष्टीने जंगी स्वागत; चंद्रकांत पाटलांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

November 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved