Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

by News Desk
February 20, 2026
in Pune, Uncategorized, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आज फूट आणि आधुनिक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. कधी काळी दुसऱ्याच्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू न शकणारे बांधव जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू चंद्रकांत पाटलांच्या संवेदनशीलतेची पावती देत होते.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” हा समतेचा आणि सेवेचा मंत्र दिला आहे. समाजाचे काम हे स्वतःच्या पोटाला झळ पोहोचल्याशिवाय उभे राहत नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची व्याप्ती वाढवून स्वयंसेवी संस्थांना बळ दिले पाहिजे. तसेच, स्वयंसेवी संस्थांनी आपले काम हे ‘मिशन मोड’वर केले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे केवळ विकासकामांसाठीच आग्रही असतात असे नाही, तर ते देश आणि संस्कृती संवर्धनासाठीही नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याशिवाय गरजू लोकांसाठी ते सदैव कार्यतत्पर असतात, अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक कार्यासाठी महापालिका नेहमीच आपल्या पाठीशी असेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

मोनिका मोहोळ म्हणाल्या की, चंद्रकांतदादा हे समाजाचे पालनकर्ते आहेत. शंभर टक्के समाजकारणावरच त्यांचा भर असतो. त्यांनी आपल्या कामातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम फ्यूप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमिष मेहरा, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, राजेंद्र जोग, विश्वस्त आणि दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील नगरसेवक भाजपचे सर्व पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-शाळेत सोडतो म्हणून गाडीत नेले अन्…; पुण्यात १३ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडून लैंगिक अत्याचार

-भिगवणमध्ये भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यांत तिखट फेकून तरुणीचे अपहरण, पोलिसांकडून ६ टीम रवाना

-शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

-युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

-महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम

Tags: bjpChandrakant Patilpuneचंद्रकांत पाटीलपुणेभाजप
Previous Post

शाळेत सोडतो म्हणून गाडीत नेले अन्…; पुण्यात १३ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडून लैंगिक अत्याचार

Next Post

संख्याबळ नसलेल्या काँग्रेसचा मोठा डाव! ‘त्या’ प्रस्तावाने भाजपपुढे पेच? स्थायीची पहिलीच बैठक गाजणार

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
संख्याबळ नसलेल्या काँग्रेसचा मोठा डाव! ‘त्या’ प्रस्तावाने भाजपपुढे पेच? स्थायीची पहिलीच बैठक गाजणार

संख्याबळ नसलेल्या काँग्रेसचा मोठा डाव! 'त्या' प्रस्तावाने भाजपपुढे पेच? स्थायीची पहिलीच बैठक गाजणार

Recommended

‘पुणे की पसंत मोरे वसंत’ स्टेटसमुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत; पुण्यात मोर्चेबांधणीला सुरवात

February 8, 2024
अपघातानंतर आमदाराचा पुतण्या पळून गेला; स्थानिकांचा गंभीर आरोपावर दिलीप मोहिते म्हणाले, ‘माझा पुतण्या…’

June 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved