Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

गणेश बिडकरांची कल्पना कामी आली, ‘लाईट हाऊस’मुळे हजारो हातांना रोजगाराची संधी मिळाली

by News Desk
January 5, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
गणेश बिडकरांची कल्पना कामी आली, ‘लाईट हाऊस’मुळे हजारो हातांना रोजगाराची संधी मिळाली
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग २४ ड चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना दिशा देत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम या प्रकल्पातून सुरू आहे.

वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी या तरुणांमध्ये विविध कला, कौशल्य आणि काम करण्याची जिद्द असते. या वास्तवाची जाणीव ठेवून गणेश बिडकर यांनी त्यांच्या कौशल्यांचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इतर तरुणांप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशातूनच २०२१ साली सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात केली.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

या प्रकल्पाचा मोठा फायदा कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, गणेश पेठ या भागांतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांना झाला आहे. वस्तीपातळीवरील तरुण-तरुणींसाठी रोजगारनिर्मिती हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू असून, १८ ते ३० वयोगटातील तरुणांना एक महिन्याचे सघन प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे तरुणांना स्वतःची करिअरविषयक स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळत असून, स्वतःसह कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होत आहे.

२०२१ ते २०२५ या कालावधीत १५०० हून अधिक तरुण-तरुणींनी या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी साडे पाचशेहून अधिक तरुण-तरुणींना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे आकडे या प्रकल्पाच्या यशाची साक्ष देणारे ठरत आहेत.

लाईट हाऊस प्रोजेक्टमध्ये प्रशिक्षण देण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची करिअर टेस्ट घेतली जाते. त्यांच्या आवडी, गुणवत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. या प्रकल्पाअंतर्गत टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन, विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस यांसह अनेक व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.

उच्च दर्जाच्या आणि गरजाधिष्ठित प्रशिक्षणामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान सुधारले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून वाचले असून, मुख्य प्रवाहात येत स्वतःचे करिअर घडवून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून तरुणांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करत, समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

-डेक्कन शुगर संस्थेच्या जागेचा घोटाळा उघड; पार्थ-सुनेत्रा पवारांचा थेट संबंध? विजय कुंभारांचा मोठा गौप्यस्फोट

-पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

-‘दादा हाच का तुमचा वादा?’ म्हणत सुस, बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा

-ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

Tags: Ganesh BidkarLight Housepuneगणेश बीडकरपालिका निवडणूकपुणेलाईट हाऊस
Previous Post

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

Next Post

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
MLA Hemant Rasane

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

Recommended

‘आम्ही दडपशाही नाही लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे

Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

April 6, 2024

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

November 29, 2023

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved