Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड: दोन्ही राष्ट्रवादींची गट्टी जमली अन् प्रशांत जगतापांनी दिला राजीनामा

by News Desk
December 23, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड: दोन्ही राष्ट्रवादींची गट्टी जमली अन् प्रशांत जगतापांनी दिला राजीनामा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची (शरद पवार आणि अजित पवार) पुण्यात आघाडी होण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. युतीला त्यांचा ठाम विरोध असल्याने हा निर्णय अपेक्षित होता.

नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही गट एकत्र लढले होते. महापालिकेसाठीही खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्या. युतीसाठी शरद पवार गटाकडून वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांची समिती स्थापन झाली; मात्र प्रशांत जगतापांना या समितीत स्थान न दिल्याने त्यांचा संताप वाढला.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

प्रशांत जगतापांनी यापूर्वीच “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकारणातून काही काळ विश्रांती घेईन” असा इशारा दिला होता. महाविकास आघाडीतच राहण्याचा त्यांचा आग्रह होता. आता त्यांनी समर्थक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन राजीनामा घेतला असून, तो सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राजीनामा स्वीकारल्यानंतर जगताप ठाकरे सेना किंवा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्षांतून ते महापालिका निवडणूक लढवू शकतात. प्रशांत जगतापांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घडामोडींमुळे पुण्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणात नवे वळण आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत’, जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय कुंभार-अंजली दमानियांचा दावा!

-पुण्यात अजितदादांची ‘पॉवर’, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा झटका

-रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

-‘आज २२ जणांचा प्रवेश झाला, पुढेही धक्कातंत्र चालू राहील’, महेश लांडगेंचा रोख नेमका कोणाकडे?

-बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले

Tags: ajit pawarncpPalika ElectionPrashant Jagtappunesharad pawarSupriya Suleअजित पवारपुणेपुणे पालिका निवडणूकप्रशांत जगतापराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

‘पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत’, जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय कुंभार-अंजली दमानियांचा दावा!

Next Post

भाजपची ‘दोस्तीत कुस्ती’, अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला दिली ऑफर

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
भाजपची ‘दोस्तीत कुस्ती’, अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला दिली ऑफर

भाजपची ‘दोस्तीत कुस्ती’, अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला दिली ऑफर

Recommended

Pune Corporation

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

August 22, 2025
Ajit Pawar And Devendra Fadnavis

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीची मैत्रिपुर्ण लढत; फडणवीस-अजितदादांची रणनीती

December 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved