पुणे : ‘शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये’ असं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण न्यायासाठी कोर्टातच जाणं गरजेचं असतं. अनेकदा न्याय मिळण्यास विलंब होतो. अशीच एक धक्कदायक घटना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये घडली आहे. एका व्यक्तीने २५ वर्षे न्यायालयात फेऱ्या मारल्या. मात्र न्याय काही मिळाला नाही. शेवटी या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
न्याय न मिळाल्याच्या नैराश्यातून न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन संपवले आहे. नामदेव जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. नामदेव जाधव यांनी चिट्टी लिहून आपल्या खिशात ठेवली. या चिठ्ठीमध्ये केस नंबर लिहला असून नामदेव यांनी अनेक वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, २००० सालापासून नामदेव जाधव हे न्यायासाठी न्यायालयात फेऱ्या मारत होते. गेल्या २५ वर्षांपासून न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जाधव यांचा मृतदेह सध्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम अदानी समूहाला, दीड हजार कोटींची निविदा मंजूर
-पुण्यातील शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण, आक्रमक पालकांची काय भूमिका?
-पबजी खेळताना ओळख, प्रेमाला नकार, त्याने तिचे AI द्वारे अश्लील फोटो बनवले अन् थेट…
-IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अॅप ठरतेय नंबर वन!
-गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी














