पुणे : सांस्कृतिक वारसा लाभेलल्या, विद्येचं माहेरघर म्हणून जगभर ख्याती असलेल्या या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. काही गँगस्टरही याच पुण्यात तयार झाले आहेत. एकीकडे पुणे पोलिस चिल्लर गुंड, चोरट्यांना गुडघ्यावर बसवत त्यांची धिंड काढतात. तर दुसरीकडे सराईत गुंड ज्याच्यावर खून, खंडणी, अपहरण, मारामारी, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असणारे गुंड थेट देश सोडून पळून जातात. पुण्यातील गुंड निलेश घायवळवर पुणे पोलिस मकोका अंतर्गत कारवाई करणार त्याआधीच त्याने धूम ठोकली ती देश सोडून थेट लंडनला.
काही दिवसांपूर्वी कोथरुड परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या तरुणाने साईड दिली नाही म्हणून त्या तरुणावर गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. गोळीबार करणारे तरुण दुसरे तिसरे कोणी नसून निलेश घायवळ टोळीचेच होते. आज समोर आलेल्या माहितीवरुन, निलेश घायवळनेच टोळीतील मुलांना आपली दहशत कमी झाली आहे. चर्चा झाली पाहिजे म्हणून पिस्टल दिलं होतं. या प्रकरणी निलेश घायवळसह टोळीतील अनेक गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले. त्यातच पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करण्याआधीच निल्याने देश सोडून पळ काढला.
लंडनमध्ये अलिशान घर
गुंड निलेश घायवळने भारतात गुन्हेगारी कृत्यामधून प्रचंड पैसा कमावला. या पैशातून त्याने लंडनमध्ये अलिशान घर घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच निलेशचा मुलगाही लंडनमधील हायफाय शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. यावरुन पुणे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढा मोठा गुंड ज्यावर मोठमोठे गुन्हे नोंद असताना देखील देशाबाहेर एवढी संपत्ती आणि ऐशोआराम? निलेश घायवळ भारतात गैरकृत्यातून पैसे कमवत असताना त्यावर पोलिसांची नजर नव्हती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, कोथरुड गोळीबार प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.तसेच या संपूर्ण प्रकरणावर बोलताना ‘निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही’, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्याबाबत लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या लाडक्या आमदाराच्या हत्येचा कट, तपासासाठी ATSची स्थापना
-‘मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या मुलांची…’, शेतकऱ्यानी चिठ्ठी लिहीत संपवलं जीवन
-भाजपसाठी अटीतटीचा सामना, मोहोळांवर दिल्लीचा विश्वास; सोपवली मोठी जबाबदारी
-शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य
-तिथं आयुर्वेदिक मसाज सेंटर नाही तर सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश














