Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

by News Desk
December 31, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर होताच तिकीट मिळालेल्या उमेदवारांकडून जल्लोष साजरा होत असताना, उमेदवारी हुकलेल्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ऐनवेळी तिकीट कापले गेल्याने नाराजांनी पक्षांतर किंवा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेतला असून, मागचा-पुढचा विचार केला नाही.

एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तुरुंगात असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयावर प्रचंड टीका होत असतानाच भाजपनेही त्याच वाटेवर पाऊल ठेवले आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांनी रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर परिसरातून भाजपच्या तिकिटावर अर्ज दाखल केला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

गेल्या वर्षी शरद मोहोळचा टोळीयुद्धातून राहत्या घराजवळच खून झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोहोळ सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत सक्रिय झाला होता. आता त्याच्या हत्येनंतर पत्नीला भाजपने मैदानात उतरवल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्था ऐरणीवर आली असतानाच भाजपच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट देण्याच्या या ट्रेंडमुळे राजकारणात नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिका निवडणुकीत हे निर्णय पक्षांच्या रणनीतीचा भाग असले तरी यामुळे विरोधकांना नवे हत्यार मिळाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन पक्षांनी धोका पत्करला असून, निकालात याचा परिणाम कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

-माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!

-पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

-अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

-भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल

Tags: ajit pawarBandu AndekarbjpDevendra FadnavisGajanan Maraneअजित पवारगजानन मारणेदेवेंद्र फडणवीसबंडू आंदेकरलक्ष्मी आंदेकरसोनाली आंदेकर
Previous Post

आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

Next Post

‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश

'निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते' लहू बालवडकरांचा ठाम संदेश

Recommended

Ajit Pawar And Sunil Shelke

सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल

November 8, 2024
Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

June 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved