Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…

by News Desk
October 31, 2025
in Pune, पुणे शहर
‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सायबर फसवणुकीचा एक अनोखा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर ‘प्रेग्नंट जॉब’ नावाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला ११ लाख रुपयांचा मोठा फटका बसला. या जाहिरातीत ‘एका महिलेला गर्भवती केल्यास २५ लाख रुपये मिळतील’ असा आकर्षक दावा करण्यात आला होता. या आमिषाला बळी पडून कंत्राटदाराने रक्कम भरल्यानंतर त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सध्या बाणेर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू असून, ठगांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बाणेर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटदाराच्या मोबाइलवर ‘प्रेग्नंट जॉब’ शीर्षकाचा एक व्हिडिओ आला. या व्हिडिओत एक महिला म्हणत होती की, ‘मी अशी व्यक्ती शोधत आहे जी मला आई बनवेल. त्याचा रंग, शिक्षण किंवा जात मला काही फरक पडत नाही.’ व्हिडिओतील संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला ‘प्रेग्नंट जॉब फर्म’चा सहाय्यक असल्याचे सांगितले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

त्याने कंत्राटदाराला सांगितले की, महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि ओळखपत्र तयार करावे लागेल. त्यानंतर काही दिवसांत कंत्राटदाराकडून रजिस्ट्रेशन फी, आयडी कार्ड, व्हेरिफिकेशन आणि जीएसटी अशा विविध नावांखाली पैसे मागितले गेले. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ते २३ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण ११ लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले. या काळात ठगांनी त्याला खोट्या आश्वासनांनी आणि कधी धमक्यांनी गप्प ठेवले.

कंत्राटदाराने त्यांच्या मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला ब्लॉक करण्यात आले. या घटनेनंतर कंत्राटदाराला फसवणूक झाल्याचे समजले आणि त्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी सायबर सेलची मदत घेऊन ठगांच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या जाहिराती सोशल मीडियावर वारंवार दिसत असल्याने नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठगांच्या मागावर पोलिस असून, लवकरच त्यांना पकडण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

-पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

-गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

-पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस

-हीच खरी माणूसकी! रामाचा ३ वर्षांचा मुलगा हरवला अन् सद्दाम खान देवासारखा धावून आला

Tags: Cyber ​​Crimepune
Previous Post

आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

Next Post

मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले...

Recommended

‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील

‘पराभव होताना दिसला की कोल्हा उसात जातो आणि उंदीर बिळात जातो, तसंच…’; आढळराव पाटलांची कोल्हेंवर बोचरी टीका

April 27, 2024
मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी

March 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved