पुणे : पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2022 मध्ये मागणी लावून धरली होती.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अर्थात ‘‘नमामी इंद्रायणी’’साठी सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता याबाबत सातत्त्याने केलेले पाठवायला अखेर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, Water ATM, Public Toilet, Street Furniture, Chain link fencing compound wall आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
🌊 ‘‘नमामी इंद्रायणी’’ ला चालना अन् पर्यावरण संवर्धनाचा संकल्प! 🌳 नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य होणार.
पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे… pic.twitter.com/lR4dIk2WAa
— Mahesh Landge (@maheshklandge) September 18, 2025
केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत अंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची अपर मुख्य सचिव, (नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रकल्पांचा अनुषंगाने आज बैठक झाली. सदर बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखड्याला तांत्रिक समिमीची मान्यता मिळाली आहे.
राज्यातील तमाम वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजप महायुतीच्या सरकारने पिंपरी चिंचवड करांना दिलेल्या शब्द खरा केला, असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस
-‘हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे’- डंबाळे
-गुलाबी जॅकेट काढत अजितदादा बनले रजनीकांत! पालिका निवडणुकीसाठी उपनगरांत साखरपेरणी














